Monday 29 June 2015

These Are The Highest Paying Programming Languages You Should Learn, Ranked By Salary

Computer programming has quickly become one of the most lucrative industries in the United States. In fact, the average salary for a computer programmer just hit an all-time high as it approaches $100,000. But, there are some languages and skill sets that are more valuable than others,and Quartz has compiled some data to break down these differences.
Quartz's Max Nisen pulled out some figures on the most valuable programming languages based on a larger study from the Brokings Institution that was published in July.
Based on that data, here are programming languages listed next to their average annual salary from lowest to highest:
12. PERL - $82,513
11. SQL - $85,511
10. Visual Basic - $85,962
9. C# - $89,074
8. R- $90,055
7. C - 90,134
6. JavaScript - $91,461
5. C++ - $93,502
4. JAVA - $94,908
3. Python - $100,717
2. Objective C - $108,225
1. Ruby on Rails - $109,460
While some of these coding languages can help you earn around $100,000, train to become a Salesforce Architect if you want one of the highest paying jobs in tech. According to data from IT recruiting firm Mondo that was published back in March, Salesforce Architects can earn anywhere between $180,000 and $200,000.
Source- http://www.businessinsider.in/These-Are-The-Highest-Paying-Programming-Languages-You-Should-Learn-Ranked-By-Salary/articleshow/45223268.cms?from=mdr

TO SURVIVE & STAY AFLOAT IN THE JOB MARKET CONTINUOUS KNOWLEDGE UPGRADATION IS THE ONLY WAY & OPTION.

What Happens when you standstill on a Moving Treadmill? You fall down, this is what happens when You stop learning & acquiring Knowledge both Professional & general. Today is the age where knowledge is also a Currency/Passport which you can use to go up the Career ladder, so all of you who have just completed your Graduation & eagerly/impatiently waiting to enter the Corporate World should always remember this point, learning means you are upgrading your knowledge, just like Computers & other equipment’s even we need constant upgradation to stay in tune with the time which is a must to survive in today’s World.
As our Society is growing & developing at a very rapid pace new things (Goods & Services) are coming into existence which is more efficient, modern & most importantly very disruptive, the manner in which technological inventions & innovations are moving its good for the society as a Product or Service but it’s also becoming a Source of risk to the Jobs of Millions of educated People, day by day everything is getting automated at such a pace that in times to come everything be it product or service will be undoubtedly used or consumed by Human beings but it will be manufactured by Robots (For Products) & serviced by automated process (Computers), so in the times to come there will be another revolution or shall we say churning in the jobs market (Max within the next 10-15 Year or even earlier) so it’s a no brainer that we should equip ourselves with as much knowledge & expertise that we can survive such a doomsday scenario. In short all of you must not relax after getting a job you should learn constantly to at least be relevant on the horizon otherwise you will fall behind & your career will be over.
Recently there was an article in a Business daily (about CTS) in which it said that due to rapid improvements & innovations in technology IT Companies are earning more despite hiring less work force than they did say 5-10 Years ago, in the same column it was written that today to earn 1 Billion US Dollars (About Rs.6350 Crores 1USD = Rs.63.50) a Company does not hires a Single Person while few Years ago to earn the same 1 Billion US Dollar Companies had to Hire about 14000 Persons, this is the kind of change I am talking about to all of You, so in the times to come only the best of the best will survive in the Job Market.
A lot of People on Infosys groups think that Java is being replaced by Python from June 2015 onwards so there is no need to learn Java, such type of mindset is very silly & childish as till a technology exists it will be used somewhere or the other & so whether Infosys uses/trains Java or not is not relevant but its relevant for You as a Person to know & learn Java, as if not today it may be of use to You in future.
So all of You Future Infosys Joinees learn as much as you can if you want to insure your Job & Career. All the Best, learn honestly & seriously as your main Mission in going to Mysore is getting trained in various technologies & not to go on a Paid Vacation.

Author- Sanjay Singh
 Source- https://www.facebook.com/groups/303710143144439/permalink/415686598613459/

Friday 31 October 2014

My Infosys Interview Experience

Infosys visited VJTI, Mumbai on 20th & 21st October, 2014.

There were only two rounds.

1st round was Aptitude test and 2nd round was Technical and HR interview.

The Aptitude was easy and but don't take it lightly.

It had 3 sections:

Every section has sectional cut-off with sectional timing.

1. Reasoning - 15 questions, 25 min.

It was quite easy. It contained syllogisms, data sufficiency, data interpretation (line graphs) , and drawing conclusions, seating arrangement like questions.

2. Quantitative Aptitude - 10 questions, 25 min.

It was also easy. It contained questions based on arithmetic, boats and streams, time and distance, geometry, volume and area.

3. Verbal ability - 40 questions, 35 min.

The most difficult questions, due to time limit was Verbal ability. Don't waste time reading passages initially, do it at last.

Out of the 192 eligible students only 64 were shortlisted for interview and I was one of them.

They called us on 21st October (next day) at 8:30 am for Interview.

Interview process started at 9:30.

They called me at 12:30. Till 12:30 I was just hanging out with my friends and It was helps me a lot in interview.

Interviewer from computer background and I'm also from computer background.

So he asked me several questions.

- Tell me about your academics?

- He had my Infosys form with all mark sheets from 10th to M. Tech. So he asked me questions related to academics only.

- Tell me your area of interest, I told coding, so he didn't asked me a single question on coding.

- He chose 1 subject from every year of B-Tech and M. Tech and asked a basic question on that subject.

- I was not confident with my answers, Interviewer was very co-operative, so be relaxed and then start answering.

- He asked me any question? I asked- Where do I need to improve myself? He told me don't focus on any particular subject, try to learn and understand each and every subject in your field.

Again he asked any other question? I said no.

After this he said, "you can go now and it was very nice talking to you".

And he stood up and we shakes hands.

I think I was not selected so they called me again for Interview.

This time HR was different, now he asked me below questions.

Me : May I come in sir,
HR : Yes Pankaj come in, So pankaj are you from computer department?
Me : Yes sir.

HR : I'm from chemical department, so you have better knowledge than me in computer.
(I think he told me this because I feel comfortable and tell him all the answers confidently).
Me : I smiled and say ok sir.

HR : Now he directly asked me about my project.
Me : I tell him whole project very confidently.

HR : What's your role in project?
Me : I did coding part.

HR: Which language have you used in your project?
Me: Told.

HR : Asked me algorithms used in coding.
Me : Told.

This time I was very confident and smiling without any fear.

Then he asked me some HR questions like why M.Tech, why Infosys, why VJTI, what are the challenges have you faced in your life etc etc.

I told each and every answers confidently and I was fully prepared for this type of questions then he asked me any question to me?

Me : What are the challenges for coders in Infosys?
HR : Told but I was little bit confused.
HR : Any other question?
Me : Where do I need to improve myself?

HR: He told me the same answer.

After this he said, "you can go now and it was very nice talking to you Pankaj".

I smiled and said thank you.

Overall it was a good experience. You are not required to answer every questions correctly. You may not even answer, if you are not aware of it and simply say Sir, I can't recall it right now.

But, be confident and be sure that what you answer is 100% correct.

Finally on 22nd October 2014, our TPO displayed selected candidates list on notice board in morning and my name was there.

Out of 64 eligible students for interview, 46 were selected.

Prepare well. All the best. I hope this one will be helpful to you.

Friday 9 May 2014

निर्माता एम-इंडिकेटरचा..."Inventor of M-Indicator"


गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. या शोधातूनच उद्याच्या नवनव्या गोष्टी समाजाला मिळतात. शोधकर्त्यांच्या याच यादीत 'एम इंडिकेटर' या अ‍ॅपद्वारे आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेय, सचिन टेकेने. ५५ लाख मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या 'एम इंडिकेटर' या मोबाइल अ‍ॅपद्वारा सचिन आज घराघरांत पोहोचला आहे. या शोधामुळे 'मोबॉण्ड' या सॉफ्टवेअर कंपनीचा तो आज मालक आहे. एका तरूण, मराठमोळ्या उद्योजकाच्या या अ‍ॅपच्या टेक-ऑफची ही रंजक गोष्ट -

मुंबईकरांचे अवघे जीवन हे घडय़ाळ्याच्या काटय़ावर फिरत असते. सकाळी अमुक वाजता उठा. मग ऑफिसची किंवा शाळा-कॉलेजची तयारी करा. कोणाला ७.४० ची लोकल पकडायची असते तर कोणाला ९.२०.. बहुतांश मुंबईकरांची सकाळ सुरू होते ते ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी अशा विविध मार्गानी प्रवास करीत आपापल्या कार्यक्षेत्रात वेळेवर पोहोचण्याची. यात एखाद्या ट्रेन वा बसची वेळ जरा जरी चुकली तरी सगळे दिवसभराचे कामाचे गणित कोलमडते. या त्रासाला रोज हजारो मुंबईकर सामोरे जातात. त्यांच्यातलाच एक, सचिन टेके. नेरुळला राहणारा सचिन रोज कॉलेजसाठी आणि त्यानंतर नोकरीनिमित्ताने नेरुळ ते अंधेरी ट्रेन, बस, रिक्षा असा प्रवास करीत असे. या प्रवासात रोज त्याचे दोन ते अडीच तास जायचे. त्यातही ट्रेन वा बसची वेळ माहीत नसल्यामुळे बराच वेळ वाया जाई. त्यातूनच त्याला वाहतुकीच्या या विविध मार्गासाठी वेळापत्रक दर्शवणारं अ‍ॅप बनवण्याची कल्पना सुचली. आणि निर्मिती झाली 'एम इंडिकेटर' या अ‍ॅपची.
शाळा-कॉलेजात असल्यापासूनच सचिनला काही तरी नवीन बनवण्याची आवड होती. तीच पुढे एका नव्या शोधाची प्रेरणा ठरली. चार वर्षांपूर्वी जर कोणी सांगितले असते की मोबाइलमध्ये ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी यांचे वेळापत्रक तसेच त्यांचा तिकीट दर किती आहे हे आपण पाहू शकू तर कोणी त्यावर विश्वास ठेवला नसता. मात्र चार वर्षांपूर्वी एका तरुणाने हा विचार केला आणि पुढच्या दोन वर्षांत तो अमलातही आणला. संपर्कमाध्यमातील क्रांतीचा फायदा घेत त्याने असे अ‍ॅप्लिकेशन बनवले की ज्यामुळे एका क्लिकसरशी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरचे वा मुंबईतल्या बसेसचे मार्ग त्याच्या 'एम इंडिकेटर'द्वारे सहज उपलब्ध झाले. 
अर्थात यामागे सचिनची दोन वर्षांची अथक मेहनत आहे. सचिन व्हीजेटीआयचा आयटी इंजिनीअर. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणते नवनवीन शोध लागताहेत, कोणते नवीन फोन, सॉफ्टवेअर तयार होतायत याविषयी त्याला नेहमीच उत्सुकता असायची. परीक्षेच्या वेळेस सचिनचे लक्ष अभ्यासापेक्षा एखादा प्रॉब्लेम कसा सोडवायचा यातच जास्त असायचे. सचिन गमतीने सांगतो, 'कॅम्पसमध्ये नोकरीसाठी कॅम्प लागायचे तेव्हा मला माझे मित्र विचारायचे, तू कुठे नोकरी करणार, तेव्हा मी त्यांना थट्टेने म्हणायचो, बॉस नोकरी कोणाला करायची आहे?' तेव्हा गमतीने बोललेले शब्द खरे करीत सचिनने एक वेगळी वाट चोखाळत उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. सुरुवातीला चार वर्षे त्याने नोकरी केली. पण त्यात त्याचे मन रमले नाही. काही तरी वेगळे करायचे या विचाराने सचिनने आपल्या कामाचा अनुभव वापरीत हे अ‍ॅप विकसित करण्यास सुरुवात केली. सकाळी नोकियाची नोकरी, मग एमबीए कॉलेज आणि त्यानंतर रात्री १० वाजता घरी पोहोचल्यावर रात्री ३ पर्यंत जागून हे 'एम इंडिकेटर' अ‍ॅप्लिकेशन त्याने विकसित केले. सुरुवातीला घरातल्यांना त्याने आपल्या कामाचा थांगपत्ताही लागू दिला नाही. मात्र ही सगळी धावपळ करताना कामाचा ताण येऊ लागला, तेव्हा मात्र त्याने घरच्यांशी बोलून आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ हेच काम करण्याचा निर्णय घेतला. २००९ ते २०११ असे दोन वर्षे सातत्याने काम करीत त्याने 'एम इंडिकेटर' बाजारात लाँच केले. खरे तर चार ते पाच वर्षांपूर्वी बाजारात रेल्वे वेळापत्रक माहिती पुस्तिका उपलब्ध होती, पण गर्दीच्या वेळी हे वेळापत्रक काढून वाचणे, पान उलटणे तसे कठीणच होते. म्हणून सुरुवातीला त्याने रेल्वे वेळापत्रक या अ‍ॅपवर दिले. पण नंतर त्याच्या लक्षात आले आपल्यासोबत आणखी एक कंपनी हेच काम करतेय तेव्हा यात आपण वेगळे काय देऊ शकतो, या विचाराने त्याला झपाटले. पुढच्या सात दिवसांत त्याने दिवस-रात्र एक करीत रेल्वे वेळापत्रकाबरोबर मुंबईतल्या बसेसचे मार्ग, रिक्षा-टॅक्सी यांचे भाडे, रेल्वेचे मेगा ब्लॉक यांचीही माहिती दिली. आणि या मार्केटमधले आपले वर्चस्व कायम राखले. तोपर्यंत त्याचे हे काम अनेकांनी नावाजले. त्यासाठी त्याने वापरलेली छोटीशी क्लृप्ती कामी आली. त्याने एका इंटरनेट साइटवर आपले हे सॉफ्टवेअर अपलोड केले. थोडय़ाच कालावधीत अनेकांनी त्या साइटला भेट दिली आणि त्याचे हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केले. त्याच्या मते जेव्हा तुम्हाला स्पर्धा निर्माण होते, तेव्हाच तुम्ही जास्त चांगले काम करता. याच पद्धतीने सतत वेगळे काही तरी देण्याच्या प्रयत्नात त्याने या अ‍ॅपमध्ये सातत्याने बदल केले. आणखी कोणती माहिती, सुविधा यांची लोकांना गरज आहे याचा त्याने अभ्यास केला. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की मुलांना नोकरीच्या संधीची गरज आहे. त्यासाठी अनेक जॉब देणाऱ्या इंटरनेट साइट्सही उपलब्ध आहेत. पण इथेही सगळ्यांकडेच कॉम्प्युटर, लॅपटॉप असेल असे नाही किंवा हल्ली लोकांना वेळ खूप कमी असतो. काही जणांना अ‍ॅप्लिकेशन कसे करावे हे माहीत नसते. ही गरज ओळखून त्याने नोकरीच्या संधी कुठे कुठे उपलब्ध आहेत याची माहिती देण्यासाठी जॉब्स इंडिकेटरची सुरुवात केली. इथे त्याने एक छोटा पर्यायही लोकांना दिला. तिथे जाऊन एकदाच तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरायची. त्यानंतर ती कुठे पाठवायची असेल तर त्या ऑफिसच्या गरजेप्रमाणे योग्य पद्धतीने ती दुरुस्त करून त्या त्या संस्थेला, कंपनीला पाठवली जाते. त्यासाठी त्याच्या अ‍ॅपमध्ये त्याने जी सुविधा दिलीय त्यामुळे आपोआप, तुमच्या माहितीच्या अनुषंगाने एक ई-मेल तयार होतो आणि तो त्या कंपनीकडे पाठविला जातो. त्यासाठी दरवेळेस स्वत:ची माहिती भरायची आणि पाठवायची कटकट कमी होते. दुसरे म्हणजे लोक, विशेषत: तरुण मुले हल्ली पेपर फार वाचत नाहीत. अशांना हे अ‍ॅप विशेष उपयुक्तआहेत असे त्याला वाटते. त्याचप्रमाणे त्याने यात आता लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक द्यायला सुरुवात केली. कारण लांब पल्ल्याच्या गाडय़ा बऱ्याचदा तांत्रिक कारणे किंवा अपघात यामुळे उशिरा येतात तेव्हा तासन्तास प्रवाशांचा खोळंबा होतो. ते लक्षात घेऊन त्याने या अ‍ॅपवर कोणती ट्रेन कोणत्या स्टेशनवर किती वेळ थांबणार याची माहिती द्यायला सुरुवात केली. त्यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व सुविधा लोकांना देताना त्याने लोकांच्या गरजेची, मागणीची नस अचूक ओळखली. मराठी माणूस हा मुळातच नाटकवेडा आहे. त्यांचं हे नाटकप्रेम पाहून त्याने मुंबईतल्या व आसपासच्या नाटय़गृहांतील नाटकांच्या प्रयोगांची माहितीही आपल्या या अ‍ॅपवर देण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही, तर सोबत िहदी, गुजराती आणि इंग्रजी भाषांतल्या नाटकांचे प्रयोग कुठे होणार आहेत याचीही माहिती या अ‍ॅपवर आहे. अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल वापरणाऱ्या तरुणांना नाटय़गृहात आणण्याचा, त्यांच्यात नाटकाविषयी प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने याद्वारे केला आहे. सिनेमागृहांमधील मराठी चित्रपटांचं वेळापत्रकही त्याने नुकतंच द्यायला सुरुवात केलं आहे.

सचिनचं हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. रेल्वेच्या तिन्ही मार्गाचा डाटा अपडेट करणं ही तशी खूपच किचकट, कठीण गोष्ट आहे. त्यातही ही माहिती फार जागा अ‍ॅपमध्ये व्यापणार नाही याचीही काळजी त्याला आणि त्याच्या टीमला सातत्याने घ्यावी लागते. पण तिथेही या तरुण मित्राचे दोस्तच त्याचे मार्गदर्शक होतात, त्याला सूचना करतात. आणि त्याला मदतही करतात.

त्याच्या या अ‍ॅपचं वैशिष्टय़ म्हणजे ते पूर्णपणे मोफत आहे. इतकंच काय तर इंटरनेटशिवायही तुम्ही हे अ‍ॅप्लिकेशन मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून वापरू शकता. त्यामुळेही हे अ‍ॅप्लिकेशन आज अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. झीरो मार्केटिंग हे त्याच्या अ‍ॅपचं आणखी एक वैशिष्टय़ आहे. मात्र त्याच्या मार्केटिंगसाठी काही छोटय़ा गोष्टी त्याने आवर्जून केल्या. गणपतीच्या दिवशी त्याने लोकांना शुभेच्छा देणारा आणि नवी माहिती अपलोड करणारा एसएमएस पाठविला. पुढच्या तासाभरात हजार लोकांनी त्याचं हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केलं. दिवसाला १० हजार लोक आणि महिन्याला लाखभर वापरकर्त्यांची संख्या सुरुवातीलाच त्यामुळे त्याला गाठता आली.
सचिन एका बाजूला व्यवसाय करत असला तरी त्याला विविध विषयांची आवड आहे. मॅगझिनसाठी मुखपृष्ठ डिझायिनग करणं, चित्र काढणं ही त्याची आवड आहे. त्यासाठी त्याला बक्षिसेही मिळाली आहेत. फक्त छंदाबाबतच ही विविधता आहे असं नाही, तर बीई केल्यानंतर त्याने फायनान्समध्ये एमबीए केलं. 
त्यानंतर सध्या तो कायद्याची पदवी घेतो आहे. विविध गोष्टी शिकायला आणि खूप सारे मित्र जमवायला त्याला आवडतं. त्याच्या या यशात त्याचे घरचे, त्याचे गुरुजन यांचाही खूप मोठा वाटा आहे असं तो आवर्जून सांगतो. जर इच्छा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो. अनेक संस्थांनी त्याच्या कामाची दखल घेत त्याचा गौरव केला आहे. यानंतर त्याचा मानस आहे, ही सगळी माहिती मराठी आणि िहदीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. आगामी काळात मोनो आणि मेट्रो रेल यांचंही वेळापत्रक त्याला द्यायचं आहे. पावसाळ्यात होणारी लोकांची गरसोय पाहता आगामी काळात रस्त्यावर कुठे ट्रॅफिक आहे, कुठे पाणी साठलं आहे ही माहितीही लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. त्याचप्रमाणे यानंतर भारतातल्या इतरही शहरांत त्याला अशा पद्धतीची सुविधा द्यायची आहे. अनेक मोठमोठय़ा पगाराच्या नोकऱ्यांचं आमिष तसंच हे सॉफ्टवेअर विकत घेण्याविषयी मोठय़ा रकमा मिळत असतानाही लोकांना मोफत असं अ‍ॅप्लिकेशन देणारा सचिन आपलं सामाजिक भानही जेव्हा जपतो तेव्हा इतरांपेक्षा वेगळा वाटतो.
त्याच्या मते, ज्या गोष्टींची लोकांना गरज असते त्याला मार्केटिंगची आवश्यकता नसते. ग्राहकांची नस बरोबर ओळखणाऱ्या सचिनचं एम इंडिकेटर म्हणूनच अनेक मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं आहे. 'मोबाँड' सॉफ्टवेअर कंपनीतर्फे हे एम इंडिकेटर जास्तीतजास्त लोकांपर्यंत मोफत पोहोचवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. नोकरी सोडून सचिनने आपल्या छंदाला व्यवसायाचं रूप दिलं आहे. जाहिरातींच्या माध्यमातून त्याला यातून चांगलं उत्पन्नही मिळतंय. आपल्या या यशामुळे अनेक तरुणांसाठी तो आज 'एम इंडिकेटर' म्हणजे 'मार्ग दाखवणारा मार्गदर्शक' झाला आहे.

Sunday 26 January 2014

डाव्या हाताने दिली आयुष्याला कलाटणी!

डाव्या हाताने दिली आयुष्याला कलाटणी!
पुणे - सहावीत असताना शाळेत लिफ्टमध्ये अडकून त्याचा उजवा हात गेला... आयुष्यभर चिकटलेल्या या वेदनेला कुरवाळण्यापेक्षा तिला कवटाळून त्याने झेप घेतली आणि चमत्कार घडला. दहावी आणि बारावीच काय?... तो "आयआयटी'पर्यंत गेला; तेही दोन्ही हातांची गरज असणारा संगणकशास्त्र विषय घेऊन. तिथेच तो थांबला नाही... अमेरिकेत त्याने संगणकशास्त्रातच "मास्टर इन सायन्स' ही पदव्युत्तर पदवी तर मिळविलीच; पण तेथील "लिंकडिन' या नेटवर्किंग कंपनीत नोकरीही मिळवली. जिद्द असेल तर आकाश कवेत घेता येते, हे सिद्ध करून दाखवले. या जिद्दीचे नाव नमित कटारिया!..
पुण्यातील अप्पा बळवंत चौकात राहणाऱ्या नमितच्या यशाला "सकाळ इंडिया फाउंडेशन'मुळे पाठबळ मिळाले. परदेशी शिक्षण घेण्यास जाण्यासाठी त्याला फाउंडेशनने बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली. त्याने आज ती परत केली. "सकाळ'च्या या मदतीची परतफेड म्हणून त्याने पाच हजार रुपयांची देणगीही दिली. त्याचे अनुभव आणि अपंगात्वावर केलेली मात यावर तो बोलला. प्रत्येक वाक्‍यात सकारात्मकता होती अन्‌ कोणत्याही आव्हानाला भिडण्याचा दुर्दम्य आत्मविश्‍वास होता; दु:खाला कुरवाळणाऱ्या अन्‌ हताश झालेल्या धडधाकट माणसांना उत्साह आणि ऊर्जा देणारा!
पंचविशीतला नमित म्हणतो, 'आयुष्यात जे कधीच बदलता येणार नाही, ते मान्य केलं होतं. त्यामुळं अपंगत्वाचा विचार कधी केला नाही. एक हात नसल्याची सवय झाली होती. मुंबईत असताना एकटा राहिलो; पण कोणतीही अडचण आली नाही. अपघातानं अपंगत्व आलं याचं दु:ख वाटतं. पण त्यामुळे अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला, सकारात्मकता आली. जिद्दीनं काही मिळविण्याची वृत्ती बनली. याचं श्रेय माझ्या कुटुंबीयांना आहे. माझ्या जिद्दीपेक्षा आई-वडील आणि मोठ्या भावाच्या जिद्दीची उंची खूप मोठी आहे. त्यांनी हार मानली नाही. भावानं खूप मदत केली. अभ्यासात त्याला जमलं नाही, ते त्यानं माझ्याकडून करून घेतलं.''
'ज्या माणसांकडे दोन हात आहेत, धडधाकट शरीर आहे, ती माणसं छोटी छोटी दु:खं घेऊन रडत बसतात. पण अपंग माणसांपेक्षा आपल्याला कमीच अडचणीत आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं. अनेक तरुण माझ्याकडून हे होणारच नाही, असा विचार करतात. पण यशासाठी कष्ट करावेच लागतात. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत राहिलं आणि झटत राहिलं, तर ती मिळतेच. पण अपयश आलं तरी त्यातून मिळणारा अनुभव खूप मदत करतो,'' असा आशावाद त्याने व्यक्त केला.
'सकाळ'ने धैर्य दिले!
नमित कटारिया याने "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले आणि "सकाळ इंडिया फाउंडेशन'चे कार्यकारी सचिव डॉ. अरुणकुमार कालगावकर यांच्याकडे कर्जाऊ शिष्यवृत्तीची रक्कम आणि देणगीचा धनादेश दिला. "सकाळ' आणि "सकाळ इंडिया फाउंडेशन'च्या मदतीमुळे दोन वर्षांपूर्वी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे धैर्य मिळाले, अशी भावना नमितने व्यक्त केली. "लिंकडिन' या कंपनीत तीन महिन्यांसाठी इंटर्नशिप केली. हा कालावधी संपला आणि शेवटच्या दिवशी कंपनीने मला नोकरीची ऑफर दिली, असेही त्याने सांगितले. डॉ. कालगावकर म्हणाले, ""शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी दिली जाते, त्यानंतर ती परत करायची असते. नमितने मात्र ती दीड वर्षातच परत केली.'' 

Saturday 30 November 2013

The International Society for Krishna Consciousness (ISKCON).

The International Society for Krishna Consciousness (ISKCON)
ISKCON is a religious movement that also identifies itself as The Hare Krishna Movement™. ISKCON belongs to theGaudiya-Vaishnava sampradaya, a monotheistic tradition within the Vedic and Hindu cultural traditions.
It is based on the Bhagavad-gita, the spiritual teachings spoken by Lord Krishna. According to many writings, this sacred text is over 5,000 years old, and it documents the conversation between Lord Krishna and his close friend and disciple, Arjuna.
ISKCON traces its spiritual lineage directly to the speaker of this sacred book, Lord Krishna, who is revered as the Supreme Personality of Godhead. The text teaches that the goal of life is to develop love of God, or Krishna. Love of God is realized through the practice ofbhakti-yoga, the science of devotional service.
In the latter part of the 15th century, a saint named Chaitanya Mahaprabhu revitalized the bhakti-yoga tradition by introducing an expansive spiritual movement that swept India. Central to this renaissance was Chaitanya’s emphasis on the chanting of Krishna’s name. Underlying this simple practice was a profound, rational, and intellectually comprehensive theology. Hare Krishna devotees worship Lord Chaitanya as an incarnation of Krishna for this age, and ISKCON is a continuation of the movement Chaitanya revitalized.

Wednesday 23 October 2013

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर; एक परिक्षा असते....

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर; एक परिक्षा असते
नकोशी झाली कितीही; तरीही ती दयायचीच असते
या परिक्षेची रीत जराशी वेगळीच असते
pass झाल तरीही ; आणखी एक बाकीच असते
revaluation , ATKT ची सोय इथे मात्र नसते
fail झाल तर पुन्हा तीच परिक्षा कधीच नसते
जन्म म्हणजे hallticket; आयुष्यभराचं time-table असते
examiner स्वत:मध्येच लपलेला ; अन् समाधान हीच degree असते
marks किती मिळाले ? यावरुन यश ठरत नसते
परिक्षा काय शिकवून गेली ; हेच जास्त महत्वाचे असते
अभ्यास कितीही केला ; तरी परिक्षेची वेळ वेगळीच असते
कळ्तयं पण वळत नाही अशीच काहीशी गतं असते
एकाच प्रश्नासाठी ; डोक्यात अनेक उत्तरांची गर्दी असते
खरं उत्तर कोणतं ? हे कळणंच फार कठीण असते
मनातल्या अर्जुनाला विवेकाच्या श्रीकृष्णाची गरज असते
नुसती गती असून भागत नाही ; त्याला दिशाही आवश्यक असते
नशीबाच्या कागदावर जेव्हा प्रयत्नांची शाई असते
पाणी पडले, तरी मिटणार नाही ; इतकी ती भक्कम असते
समोरच्या प्रश्नांबरोबर झुंज नेहमीच दयायची असते
स्वत: उत्तरे शोधून जगायलाच तर ती शिकवतं असते
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक परिक्षा असते.