Saturday 28 September 2013

मजुराची बायको झाली फौजदार

〓 Success story 〓
•• मजुराची बायको झाली फौजदार ••
घरात अठरा विश्व दारिद्य्र...
पती पेव्हर ब्लॉकचे काम करणारा मजूर...
गोदावरीच्या काठावरील एका पालामध्ये दोन लहानग्यांसह पुढे चाललेला संसार...

अशा अनेक आव्हानांशी लढत "ती' पदवीपर्यंतचे शिक्षण घेते...
तिथेच न थांबता दुर्दम्य
इच्छाशक्तीच्या बळावर चक्क फौजदारही होते..!
ही कहाणी आहे पद्मशीला तिरपुडे या सामान्यांतील असामान्य नारीची....!!
महाराष्ट्र पोलिस अकादमीत काल
झालेला फौजदारांच्या तुकडीचा दीक्षान्त
सोहळा या वीरांगनेसाठी आयुष्यातील परमोच्च
आनंदाचा नि अभिमानाचा ठेवा ठरला. हा क्षण
अनुभवण्यासाठी तिने केलेल्या प्रचंड संघर्षाची ही सुखद
परिणती होती.
राज्याच्या पोलिस दलास आजवर उपनिरीक्षक
दर्जाचे 24 हजार अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस
अकादमीची यंदाची 108 वी तुकडी अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या तुकडीने सर्वाधिक 1,544 फौजदार दिले आणि त्यात
चक्क 120 महिला पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकीच एक
असलेल्या पद्मशीलाचा दहा वर्षांतील प्रवास
अनेकांना प्रेरणादायी आहे.
मूळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे हिचा त्याच जिल्ह्यातील वाळकेश्वरजवळच्या पहेला गावातील
पवन तुकाराम खोब्रागडे याच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.
पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे.
पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खूप सोसलंय.
हमाली केली. सामोसे विकले. मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आज कामाला आले.
- पद्मशीला तिरपुडे, (पोलिस उपनिरीक्षक)
एक दिवस असा आला, की घरात दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. दोघंही खूप रडलो नि तसेच उपाशी झोपलो. मनाशी एकच निश्चय केला,पद्मशीलाला शिकवायचं अन् मोठी अधिकारी करायचं.
त्यासाठी खूप कष्ट केले. पण, आज तिला फौजदार झाल्याचं
बघून सगळा शीण गेला आहे.
- पवन खोब्रागडे (पद्मशीलाचा पती).

No comments:

Post a Comment